हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा गजरात हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात आलेल्या गणरायाला दि 27 सप्टेंबर रोजी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये उपस्थित गावकरी व पोलीस बांधवांनी रॅली काढून निरोप दिला…
या बाबत सविस्तर वृत्त असे की मागील वर्षापासून हिमायतनगर पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक यांच्या संकल्पनेतून हिमायतनगर पोलीस ठाण्यात 10 दिवस गणरायाची स्थापना करून दररोज येथील पोलीस कर्मचारी मनोभावे आरती व पूजा करून गणरायाच्या दहा दिवसाच्या स्थापनेनंतर आज दि 27 सप्टेंबर रोजी त्यांना निरोप देण्यासाठी सकाळी 12 वाजता सर्व पोलीस व गावकरी मंडळी एकत्रित येऊन पारंपारिक पद्धतीने टाळ मृदुंगाच्या गजरात लोकमान्य टिळकांनी सांगितलेल्या संकल्पनेनुसार कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून हिंदू व मुस्लिम एकतेचा संदेश देत हिमायतनगर पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात आलेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी सर्व गावकरी व पोलीस बांधव मोठ्या आनंदाने एकत्रित येऊन टाळ मृदंगांमध्ये गावातील मुख्य रस्त्याने मिरवणूक काढत गावातील कनकेश्वर तलाव येथील गणेश विसर्जन कुंडात श्री चे विसर्जन करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक यांनी गावातील हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा यापुढे पण अविरतपणे चालूच राहील असे मत यावेळी बोलून दाखवले आहे
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, आदिनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव, बीट जमादार कोमल कांगणे डी.एस.बी.चे कुलकर्णी, श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ,पांडू अप्पा तुप्तेवार,काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण , माजी तंटामुक्ती अध्यक्ष अनवर खान पठाण, शिवसेना उपतालुका प्रमुख विलास वानखेडे, राम नरवाडे, प्रकाश कोमावार,काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, योगेश चिल्कावार, सह पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व होमगार्ड व गावातील ज्येष्ठ नागरिक व राजकीय मंडळी उपस्थित होते…