हिमायतनगर प्रतिनिधी | नागेश शिंदे | महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटने कडून आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दिनांक 16 जुलै रोजी नांदेड येथे संपन्न झाला त्यामध्ये हिमायतनगर शहरातील शक्ती व्यंकटेश पालीकोंडलवार, तन्मय साईनाथ रामदिनवार, प्राजक्ता नाथा गांगुलवारसह स्नेहल बालाजी गागुलवार या चार विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. बालाजी कोमलवार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अतुल ढाकणे ,रवींद्र कमटम, विजय भंडारी उपस्थित होते दरवर्षी महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटने कडून विविध सामाजिक उपक्रम गेल्या दहा वर्षापासून घेतले जातात या वर्षी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने गुणवंत विद्यार्थी व नीट वैद्यकीय प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या गौरव सोहळ्यात सोलापूरचे विशेष मागास प्रवर्गाचे सामाजिक कार्यकर्ते अशोक इंदापूर यांना यावर्षीचा समाज भूषण पुरस्कार देण्यात आला त्यानंतर हिमायतनगर येथील शक्ती व्यंकटेश पालीकोंडलवार, तन्मय साईनाथ रामदिनवार, प्राजक्ता नाथा गांगुलवार सह स्नेहल बालाजी गागुलवार या चार विद्यार्थ्यांना समाजातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला