नांदेड दि. 19 :- नांदेड-भोकर रोडवर सिताखंडी मोड येथे आज दुपारी 3.50 च्या सुमारास हा अपघात झाला. टेम्पो (407) व टाटा मॅजिक यांच्यात समोरासमोर हा अपघात झाला. ग्रामीण रुग्णालय भोकरच्या 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका अन्य रुग्णाला नांदेडकडे घेऊन येत असतांना या रुग्णवाहिकेसमोरच सदर अपघात घडल्याने अती गंभीर 4 रुग्णांना नांदेड येथे तातडीने हालवणे सोपे झाले. या अपघातात जागेवरच 4 व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पाठविण्यात आले. इतर चार जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी तातडीने भोकर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात घडल्याबरोबर याची माहिती तातडीने शासकीय रुग्णालय व प्रादेशिक परिवहन विभागाला कळल्यामुळे प्रशासनाला तात्काळ पुढील व्यवस्था करणे शक्य झाले. भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेणाऱ्या चार रुग्णांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे हालविण्यात आले आहे.
# सत्यप्रभा न्यूज # नांदेड