सुदर्शन देवराये यांच्या मुलीला डॉक्टर बनविणार…
– मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या देवराई कुटुंबास अ जीवन दहा हजार रुपये देण्याचा श्रीकांत पाटील यांचा मानसहिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-मराठा आरक्षणासाठी प्राणत्याग करणारे कामारी येथील सुदर्शन देवराये यांच्या मुलीला डॉक्टर बनविण्याचा संकल्प भाजपचे डॉ. श्रीकांत पाटील यांनी घोषित केले डॉ. श्रीकांत पाटील यांनी ४ ऑक्टोबर रोजी सुदर्शन देवराये यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-मराठा आरक्षणासाठी प्राणत्याग करणारे कामारी येथील सुदर्शन देवराये यांच्या मुलीला डॉक्टर बनविण्याचा संकल्प भाजपचे डॉ. श्रीकांत पाटील यांनी घोषित केले डॉ. श्रीकांत पाटील यांनी ४ ऑक्टोबर रोजी सुदर्शन देवराये यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
मराठा आरक्षणासाठी विविध ठिकाणी उपोषण सुरू होते. त्यावेळी कामारी येथील सुदर्शन देवराये या युवकाने मराठा आरक्षणासाठी पत्नी, दोन चिमुकले, वयोवृद्ध आईवडील यांना सोडून आपले जीवन संपविले त्यांच्या मुलीला डॉक्टर बनविण्याचे स्वप्न सुदर्शन देवराये यांचे होते. अशी आठवण सुदर्शन यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी देवराये यांनी डॉ. श्रीकांत पाटील यांना सांगितली. तेव्हा मुलीच्या शिक्षणासाठी सर्व प्रकारची सामाजिक व आर्थिक मदत करणार असल्याचा निश्चय डॉ. श्रीकांत पाटील यांनी यावेळी केला. तसेच भाऊ म्हणून दर महिन्याला १० हजार रूपये ज्ञानेश्वरी देवराये यांना अजीवन ओवाळणी देण्याचा संकल्पही डॉ. श्रीकांत पाटील यांनी करून नेता कसा असावा ह्याचे उदाहरण त्यांनी समाजापुढे दाखून दिले आहे….