छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी |
विजय पाटील |
छत्रपती संभाजीनगर
दि. १३/०९/२०२३ केंद्रशासनाने २ जून २०२३ च्या अधिसुचनेद्वारे तुर व उडीद डाळीच्या मिल्स, घाऊक, अर्ध घाऊक, किरकोळ व्यापारी, आयातदारांकरीता साठा निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध दि. 30 ऑक्टोंबर पर्यंत लागू आहेत.
अधिसूचनेप्रमाणे घाऊक व्यापारी प्रत्येक डाळी साठी 200 मे.टन,किरकोळ व्यापारी प्रत्येक डाळीसाठी 5 मे टन. बिगचेन रिटेल प्रत्येक डाळीसाठी आऊटलेट साठी 5 मे टन व डेपोसाठी 200 मे टन तसेच मिल्स करीता गत तीन महिन्यातील उत्पादन क्षमता 25% आणि आयात दाराकरीता आयात दिनांकापासून 30 दिवसांचा साठा मर्यादीत करण्यात आला आहे.
सत्यप्रभा न्यूज चैनल