लातूर प्रतिनिधी | विजय पाटील
कोरोनाच्या काळात झालेल्या लॉकडाउन पासुन ऑनलाइन बँकिंगपाठोपाठ किरकोळ वस्तूंच्या खरेदीसाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा झाली. मात्र, या चांगल्या बाबींबरोबरच मटकाही ऑनलाइन झाला आहे. आकडेबहाद्दर घरबसल्या स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉपच्या साहाय्याने मटका खेळत असून, त्यांना अटकाव करण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे खरे परंतू आजूनही मटका खेळणार्यांचा विश्वास हा ‘चिट्टी’ मटक्यावर असून आता हा ‘चिट्टी’मटका काही वर्षापासून लातूर मध्ये सुप्त अवस्थेत होता त्यानंतर आता तो तोंड वर काढत आहे.भर चौकात आणि रहदारिच्या तापड़िया मार्केट मध्ये चक्क टेबल ‘टाकून ‘चिट्टी’ मटक्याने कहर केला असून …यावर पोलिसांची मेहर नजर असल्याचे आता स्पष्ट होत आहे.