– आमदार जवळगावकर यांचे आरोग्य मंत्र्यांना निवेदन…
हिमायतनगर प्रतिनिधी | नागेश शिंदे | शहरासह ग्रामीण भागामध्ये लहान बालका मध्ये डेंग्यू ची लागण मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य मेंदूवर आजार पसरत असून या आजारामुळे एकाच गावातील दोन मुले दगावले आहेत सदर आजार लहान मुलांच्या पोटामध्ये जाऊन त्यांची अचानक तब्येत बिघडत आहे त्यात त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे याला सर्वस्वी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील आरोग्य यंत्रणा जबाबदार असल्याचे मत सुजान नागरिकांतून बोलल्या जात आहे हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील 14 महिन्याचे एक बाळ डेंगूसदृश्य तापीने दगावल्याची नुकतीच घटना घडली त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली पण शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आढळून येत आहेत त्यामध्ये डेंगू चे डास तयार होऊन अनेक रुग्णांना ताप, डोकेदुखी सारखे आजार होत आहेत त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेने धूर फवारणी करून शहरासह ग्रामीण भागामध्ये या डेंगूसदृश्य आजार पसरण्यापासून तात्काळ आवर घालावा अशी मागणी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे एक लेखी निवेदन करून केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर येथील दोन बालकांचा डेंगूसदृश्यतापीने नुकताच मृत्यू झाला असल्याची घटना घडली ते शहरातील डॉक्टर विकास वानखेडे यांच्या 14 महिन्याच्या मुलाला अचानक ताप आला होता त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखवण्यात आले मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नांदेड येथे हलविले या ठिकाणी उपचार सुरू असताना त्या बालकाचा तापी मुळेमृत्यू झाला तर दुसरी घटना त्यांच्या भावकीतील पंचायत समितीचे तालुका व्यवस्थापक शंकर वानखेडे यांच्या चार वर्षाच्या मुलीला ताप आल्याची घटना घडली होती त्यांना सुद्धा हिमायतनगर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले असता त्यां मुलीस सुद्धा डॉक्टरांनी ताप आल्याचे सांगून मृत्यू झाला त्यामुळे एका तालुक्यातील पळसपूर गावावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली ही दोन्ही बालके अगोदर ठणठणीत होते पण डेंगू सदृश्य ताप आल्यामुळे या बालकांचा ताप आटोक्यात आला नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे याला सर्वस्वी हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील कचऱ्याचे ढीगारे, घाणीचे साम्राज्य जबाबदार आहे शहरात अनेक ठिकाणी नाल्या तुबलेल्या आहेत नगर पंचायत कडे सफाई कर्मचारी अपुरे असतात, ओला व सुका कचरा जमा करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाचे वाहने वेळेवर येत नाहीत ओल्या सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा शहरात कुठेही नाही व शहरात पावसाळ्याचे दिवस असताना सुद्धा कुठेही धुराची फवारणी केली जात नाही त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे येथील साफसफाई गुत्तेदाराकडून शहरात स्वच्छतेची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी हिमायतनगर येथील नगरपंचायत प्रशासनाकदे मोठ्या प्रमाणात येऊन पडल्या तरी पण येथील प्रभारी मुख्याधिकारी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत व येथील आरोग्य यंत्रणा सुद्धा वेळेवर काम करत नसल्यामुळे शहरात डेंगू सदृश्य तापीचा आजार शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरत आहे याला ह्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन येथील आरोग्य यंत्रणेस व नगरपंचायत प्रशासनास खडसावून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशी मागणी सुद्धा नागरिकासह हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली आहे