नांदेड | नुकताच मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेच्या शेवटच्या सत्राचा निकाल जाहिर झाला आहे. त्यात बोरी (चा.) ता.उमरखेड जि.यवतमाळ या छोट्याश्या खेडेगावातील युवक श्री.मंगेश प्रकाश गाडगे हा एल.एल.बी. (LL.B) ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. तो मुंबई विद्यापीठ संलग्न बाळासाहेब ठाकरे लाॕ काॕलेज, तळोजा,नवी मुंबई येथे कायद्याचे शिक्षण घेत होता.
यापुर्वी त्याने बी.एस.सी(B.Sc) आणि एम.एस.डब्ल्यु.(MSW) चे उच्चशिक्षण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथुन केले आहे. या काळात तो विद्यार्थी चळवळीत सक्रिय राहिलेला आहे.
आगोदर फुले-आंबेडकर स्टुडंट असोसिएशन (फासा) मध्ये सक्रिय होता नंतर नॕशनल एस.सी.,एस.टी.,ओबिसी स्टुडंट अँड युथ फ्रंट (नसोसवायएफ) या राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या नांदेड जिल्हा सचिव या पदावर राहुन त्याने विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांची सोडवणुक करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या बहुतांश आंदोलन, मोर्चे व उपोषणांचे नेतृत्व केले आहे. विविध राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, काव्यवाचन आणि आंबेडकरी जलसा, पथनाट्ये या कलाप्रकारांच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा त्याने योगदान दिले आहे.आजही तो त्याचे लेख आणि कवितांच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांना वाचा फोडण्याचे काम नेहमी करत असतो. समाजकार्याची मनापासून आवड असलेला हा तरुण समाजकार्याचे शिक्षण पुर्ण करतो आणि पुढे स्वतः काम करत कायद्याचे शिक्षण मुंबई सारख्या ठिकाणी पुर्ण करतो हे नक्कीच खुप महत्त्वाची बाब आहे. घरी कुठल्याही प्रकारचा शिक्षणाचा वारसा नाही. वडिल श्री.प्रकाश तुकाराम गाडगे यांनी गावात सालगडी म्हणुन काम केले तर आई सौ.रेणुकाबाई यांनी शेतमजुरी करत आपल्या लेकरांना शिकवले.
आज ते स्वतः निरक्षर असले तरी त्यांचे तीनही आपत्य उच्चशिक्षित आहेत.मंगेश सोबतच बहीण आश्वीनी बि.काॕम.,एम.एस.डब्ल्यु तर रुपाली बी.एस.सी. आहे ही खुप अभिमानास्पद बाब आहे अशी भावना व्यक्त होत आहे.
मंगेश असे म्हणतो कि, डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना माझी कायद्याची पदवी अर्पण करतो कारण हा आजपर्यंतचा अतिशय खडतर प्रवास मी पार करु शकलो त्याचे श्रेय मी डॉ.बाबासाहेबांच्या परिवर्तनवादी विचारांना देतो जो माझा प्रेरणास्त्रोत आहे आणि दुसरे माझे आई वडील,गुरुवर्य,आप्तस्वकिय व जिवाभावाचा मित्र परिवार यांना देतो. ज्यांच्या प्रेमाशिवाय व सहकार्याशिवाय हे शक्यच झालं नसतं. पुढे वकिली व्यवसायाच्या माध्यमातून गोर गरीब व उपेक्षित घटकांच्या न्याय हक्कांसाठी कायम लढत राहणार असे मत त्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
त्याच्या या यशाबद्दल श्री.संतोष आंबेकर,तालुकाअध्यक्ष, हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटी अ.जा. विभाग,श्री.किरण फुगारे, जिल्हाअध्यक्ष,आॕल इंडिया पँथर सेना,नांदेड,श्री. सयाजी वाघमारे, नेते,बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी,मुंबई प्रदेश, जेष्ठ पत्रकार नागेश सोनुले,शिद्धोदन सोनुले, पत्रकार दिनेश येरेकर,प्रफुल मुनेश्वर व बोरी येथील समस्त गावकरी मंडळी यांनी त्याचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.