पांडवकालीन गुफा असलेल्या टेकडीच्या संरक्षणासाठी राजे प्रतिष्ठान सरसावले…
हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील टेंभी येथील अबा बकर च्या टेकड्यांवर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम उत्खनन केले जात आहे. येथील टेकड्यांना ऐतिहासिक वारसा असल्याने येथे पांडवकालीन गुफा, आबा बकर चे तीर्थस्थान असून सुद्धा येथे मोठ्या प्रमाणतराज रोस पने अवैध मुरूम उत्खनन होत आहे ह्या अबा बकर टेकडी गावातील अवैध रेती मफियानी येथील महसूल प्रशासनास हाताशी धरून हे पोखरून उद्धस्त करत आहेत यासाठी हिमायतनगर येथील राजे प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष मुन्ना भाऊ शिंदे यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांना एक लेखी निवेदन देऊन या अबा बकर वरती उत्खलनाला थांबवून अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यावर कडक कारवाई करावी व ऐतिहासिक वारसा असलेले स्थळाला संरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे टेंभी शिवारामध्ये असलेल्या ऐतिहासिक वारसा म्हणून प्रसिद्ध असलेल्या पांडवकालीन गुफा व अबा बकर तीर्थस्थान असलेल्या टेकड्यांवर दिवस रात्र मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन केल्या जात आहे. चक्क राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी आबा बकर येथील टेकड्यांना पोखरून गौण खनिजाचे उत्खनन मोठ्या प्रमाणात चालू आहे. याविषयी तालुक्याचे तहसीलदार ,वन विभाग व सामाजिक वन विभाग यांच्या अधिकाऱ्यांना ही माहिती सांगून तक्रार दिल्या. तरीसुद्धा त्यांनी या गोष्टीकडे केवळ स्वार्थापोटी कानाडोळा केला असून ठेकेदार व गौण खनिज माफिया वाल्यांनी येथील माळ रानातून दिवस रात्र अवैध मुरूम उत्खनन करित आहेत यामुळे पर्यावरणाच्या अस्तित्वाला व ऐतिहासिक वारसाला बाधा पोहोचली आहे. सदरील बाबीकडे पुरातत्व विभाग व जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत साहेब यांनी तात्काळ लक्ष देऊन गौण खनिज उत्खनन करणाऱ्यावर कडक कार्यवाही करावी अशी मागणी राजे प्रतिष्ठान चे तालुकाअध्यक्ष मुन्ना भाऊ शिंदे यांनी केली आहे.
![](https://satyaprabhanews.com/wp-content/uploads/2023/06/IMG_20230613_142009-475x1024.jpg)
चौकट
सदरील जागेवरील अवैद्य गौण खनिज उत्खनन तात्काळ बंद करावे यासाठी वेळोवेळी तहसीलदार यांना मागणी करण्यात आली पण त्यांनी केवळ आश्वासन दिले.तसेच दि 8 जून 2023 रोजी रात्री 11 वाजता या ठिकाणी अवैद्य गौण खनिज उत्खनन थांबविन्यासाठी चौकशी साठी गेलो असता तेथील पंधरा लोकांनी मला धक्काबुक्की केली व जीवे मारण्याची धमकी दिली आहे व प्रशासन आमचे काही वाकडे करू शकत नाही असेही सुनावले.तसेच माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास संबंधित सर्व प्रशासकीय कर्मचारी व गौण खनिज माफिया जबाबदार असे मुन्ना शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे