मुंबई दि २९: मॉडेल उर्फी जावेदने कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भाष्य केले आहे. फेक फोटो व्हायरल करणाऱ्यांविरोधात उर्फीने टीकास्त्र सोडले आहे. आपल्या मॉडेलिंग, फोटोशूटमुळे कायम चर्चेत असणारी उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चर्चेत येण्यामागचे कारण तिचे फोटोशूट नसून तिने केलेले ट्वीट आहे. उर्फीने थेट कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भाष्य केले आहे. अनेक दिग्गज क्रीडापटू कोणतीही भूमिका घेत नसताना दुसरीकडे उर्फी भूमिका घेतल्याने अनेक युजर्सने तिचे कौतुक केले आहे. विनेश फोगाट आणि संगाीता फोगाट यांचे खोटे फोटो व्हायरल करणाऱ्यांना तिने सुनावले आहे.
उर्फी जावेदने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये उर्फीने दोन फोटोंचे कोलाज पोस्ट केले आहे. एका फोटोत संगीता आणि विनेश हे गंभीरपणे बसमध्ये बसलेले दिसत आहेत. तर, दुसऱ्या फोटोमध्ये या दोन्ही कुस्तीपटूंच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. उर्फीने फेक फोटो बनवून व्हायरल करणाऱ्यांवर टीका केली आहे. उर्फी जावेदने काय म्हटले?
संगीता आणि विनेशचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक बाजूंनी प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेकांनी या फेक फोटोवर विश्वास ठेवत कुस्तीपटूंच्या आंदोलनावर निशाणा साधला. तर, काहींनी फेक फोटो व्हायरल करणाऱ्यांचा समाचार घेतला. उर्फीनेदेखील फेक फोटो तयार करणाऱ्यांवर टीका केली आहे. तिने म्हटले की, ही तीच लोक आहेत, जी असत्याला सत्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारची एडिटींग करतात. एखाद्याला चुकीचे ठरवण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी असत्य गोष्टींचा आधार घ्यावा इतकी पातळी सोडता कामा नये असे म्हणत, उर्फी टीका केली आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी आणि विनेश यांच्या विरोधात FIR
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून महिला कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात अनेक पुरुष कुस्तीपटूही सहभागी झाले होते. रविवारी आंदोलक महिला कुस्तीपटूंसह पुरुष कुस्तीपटूंना ताब्यात घेऊन त्यानंतर त्यांना सोडण्यात आलं. यासोबतच आंदोलक कुस्तीपटूंवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कुस्तीपटूंवर दंगल भडकावण्यासह इतर कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी आंदोलक कुस्तीपटूनं जंतर-मंतरहून नवीन संसद भवनाकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी कुस्तीपटूंना अडवलं. बॅरिकेट तोडून संसद भवनाकडे पुढे जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेत त्यांच्यावर एफआयआर नोंदवला. विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंदवण्यात आला.
कुस्तीपटूंवर ‘या’ कलमांतर्गत गुन्हा दाखल
आंदोलक कुस्तीपटूंवर दंगलीसह अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये कलम 147 (दंगल), कलम 149 (बेकायदेशीर सभा), 186 (लोकसेवकाला कर्तव्यात अडथळा आणणे), 188 (लोकसेवकाने दिलेल्या आदेशाची अवज्ञा करणे), 332 (आंदोलकांनी) 353 (लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी गुन्हेगारी शक्ती) आणि लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी गुन्हेगारी शक्ती यासह, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 अंतर्गत देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. # सतयप्रभा # नांदेड