नांदेड (प्रतिनिधी) दि३०:विद्यापीठ अनुदान आयोगाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा जून 2023 संदर्भात यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदेश कुमार यांनी अगोदरच ट्विट करुन माहिती दिली होती. पण अधिकृतरित्या जून 2023 च्या नेट परिक्षेकरिता अर्ज करण्याची सुरुवात 10 मे 2023 रोजी सुरु करण्यात आले आहे तर अंतिम मुदत ३१ मे रात्री ५ वाजेपर्यंत आहे.
यू जी सी नेट जून 2023 या सत्रासाठी नोंदणी सुरू झाली असून उमेदवार अधिकृत वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. जून 2023 च्या नेट परिक्षेकरिता अर्ज भरण्यासाठी ३१ मे ला रात्री ५ वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. त्याकरिता उमेदवार लवकरच ऑनलाइन अर्ज करीत असल्याचे चित्र सध्या नांदेड शहरातील ऑनलाईन सेवा केंद्रावर दिसून येत आहे. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड