नाशिक | पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरुन अजित पवार आणि संजय राऊत आमने सामने आले आहेत. तर काँग्रेसने ही जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरुन महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आघाडीतील नेत्यांचे कान टोचले आहेत. जागावाटपाची चर्चा मीडियात करण्याची गरज नाही, अशा शब्दात भुजबळ यांनी नेत्यांना सुनावलं आहे.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे, कसेल त्याचीच जमिन या प्रमाणे, जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरले तर ‘कसबा’ प्रमाणे पुणे लोकसभा पोटनिवडणुक महाविकास आघाडीला सहज जिंकता येईल.
जागांचा आकडा वाढवण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल असे म्हटले आहे. संजय राऊतांच्या या ट्विट बाबत पत्रकार परिषदेत भुजबळ यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केली.