हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- स्टार प्रवाह वाहिनी फेम प्रस्तुत मी होणार सुपरस्टार जल्लोष महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये हिमायतनगर ची शान श्रीमयी श्रीनिवास सुर्यवंशी हिने आपली उत्कृष्ट अदाकारी दाखवत क्रमांक मिळविला व बघता बघता एवढ्या कमी वयात ती संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्यानंतर श्रीमयी सूर्यवंशी हिने नुकतेच हिमायतनगर त्यांच्या वडिलांच्या मूळ गावी आगमन झाल्याने ठिकठिकाणी तिचे स्वागत करून तिचा सत्कार करण्यात येत आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की सुपरस्टार श्रीमयी सूर्यवंशी ही शहरातील योगसाधक तथा प्रतिष्ठित व्यापारी श्री रामरावजी सुर्यवंशी यांची नात असल्याने दिनांक 16 जुलै रोजी शहरातील प्रसिद्ध असलेल्या श्री परमेश्वर देवस्थान कमिटी कडून तिचा व तिच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला व तिच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ज्येष्ठ नागरिक अक्कलवाड सर, वराडे सर ,आशिषभाऊ सकवान,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा.संचालक गणेशराव शिंदे ,परमेश्वर मंदिर कमिटीने संचालक विलासराव वानखेडे,संजय माने,रामभाऊ सुर्यवंशी भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष,ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, दिगंबर काळे ,शाम ढगे, मारोती अण्णा हेंदे ,सुभाष मामा शिंदे, नागेश शिंदे पत्रकार ,संजय कवडे मायंबा काका होळकर, परमेश्वर वानखेडे ,सदाशिव सातव ,विनोद आरेपल्लू ,वामन पाटील वडगावकर ,सटवा हेंद्रे गोविंद शिंदे ,श्याम हेंद्रे, दत्ता काळे विशाल शिंदे ,बालाजी पतंगे सह आदी ग्रामस्थ उपस्थित होते