हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- शहरातील खडकी पांदण रस्त्यावर असलेल्या शेत गट नंबर 417 मध्ये नऊ गुंठे जमीनी पैकी एक गुंठे जमिनीचा व्यवहार करून इतर सात गुंठे जमिनींचे पैसे न देता संबंधित शेतकऱ्यास व त्याच्या परिवारास वारंवार मानसिक व आर्थिक त्रास देऊन त्या शेतकऱ्याच्या अडाणी पणाचा गैर फायदा घेत जबरदस्तीने लाखो करोडो रुपयांचा भूखंड बेकायदेशीर मार्गाने कागदपत्र गोळा करून परमेश्र्वर जाधव यांच्याशी नेहमी वाद घातल्याने जाधव यांनी शेतात फवारण्या साठी आणलेले विषारी औषध दि 10 जून रोजी रात्री पिऊन आपल्या राहत्या घरी आपली जीवन यात्रा संपवीली आहे त्याप्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख इमरान शेख अनवर व मिर्झा जुनेद बेग अमीर बेग विरोधात कलम 306,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे
हिमायतनगर शहरातील खडकी पांदण येथील शेत सर्वे नंबर मधील झालेल्या प्लॉटिंग व्यवसायात एका अडाणी तरुण शेतकऱ्यांची जागा गैर मार्गाने खरेदी करण्याच्या डाव रचून व्यवहार केला त्या व्यापाऱ्याच्या जाचास कंटाळून दि 10 जून परमेश्वर जाधव या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी विषारी औषध पिले त्यांना पुढील वाटचालीसाठी नांदेड येथे नेण्यात आले होते उपचारा अंती दि 11 जून रोजी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात आरोपी शेख इमरान शेख अनवर व मिर्झा जुनेद बेग अमीर बेग यांच्या विरोधात कलम 306,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या शेतकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाल्या नंतर त्यांच्यावरच अंत्यसंस्कार करण्यात आले आहे पण संबंधित प्रकरणांमध्ये हिमायतनगर येथील रजिस्ट्री ऑफिसने कोणत्या आधारावर ही रजिस्ट्री केली आहे ह्याची सखोल चौकशी करण्यात येऊन सबंधित साद बाऱ्यावर असणाऱ्या कुठल्याही साशी दारास न बोलवता ही रजिस्टी झाली कशी ? ही रजिस्टी होताना कुटुंबाचा का विचार घेण्यात आला नाही..त्यांना का बोलावले नाही असे ना….ना प्रश्न उपस्थित होत आहेत मयताच्या घटना स्थळी असे समजले की तहसीलदार ये.णे. कसा झाला व हिमायतनगर येथील नगरपंचायत कार्यालयामार्फत ह्या शेत सर्वे नंबर चां नमुना नंबर 43 कसा झाला ह्याचा सुद्धा गोड बंगाल जनतेसमोर उघड करण्यात यावा कारण हिमायतनगर शहरात अशा अनेक प्रकारच्या प्लॉटिंग व्यवसायाचा अनाधिकृत व्यवसाय मोठ्या जोमात सुरू आहेत यामध्ये अनेक व्यापारी गोर गरिबांना तूट पुंजे पैसे देउन परस्पर लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून गोरगरीब जनतेची शेती व प्लॉटिंग व्यवसाय बळकाविण्याचा प्रयत्न येथील भूखंड व्यापारी करत आहेत अशा सर्व दिग्गज व राजकीय पुढाऱ्यांना येथील स्थानिक कोणते प्रशासकीय अधिकारी पाठीशी घालत आहेत व भ्रष्टाचाराच्या विख्यात अडकलेल्या अशा अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही वरिष्ठ जिल्हाधिकारी यांनी करावी अशी मागणी हिमायतनगर येथील पिडीत परमेश्वर जाधव यांच्या पत्नीने शासन दरबारी केली आहे.या घटनेचा तपास हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी. डी. भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी सह बीड जमादार कोमल कांगणे व नागरगोजे हे करीत आहेत आरोपीस अद्याप अटक करण्यात आली नाही असे पोलिसांनी सांगितले..