नांदेड दि २५: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 26 व्या दीक्षांत समारंभात माध्यमशास्त्र संकुलातील विद्यार्थी मिलिंद वाघमारे एम. ए. जनसंवाद आणि पत्रकारितेत विद्यापीठातून सर्वप्रथम आल्याबद्दल शास्त्रज्ञ बी. सरवणन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले, प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्र सिंह बिसेन, वडील खंडू वाघमारे यांच्या उपस्थितीत सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.
मिलिंद खंडू वाघमारे हा विद्यार्थी देगलूर तालुक्यातील कुशावाडी गावचा असून त्याचे आई – वडिल (रमाबाई – खंडू वाघमारे) शेती करीत असतात. ग्रामीण भागातील अडचणीवर मात करीत शिक्षणावर आस्था असणाऱ्या आई वडिलांनी मिलिंद वाघमारे यांना नेहमीच प्रेरणा दिली तर लग्नानंतरही पत्नी कोमल वाघमारे हीने साथ दिली. कौटुंबिक जबाबदारी असताना सुध्दा शिक्षण घेण्याची जिज्ञासा इतरांना नक्कीच प्रेरणा देणारी आहे. ग्रामीण भागातून पत्रकारितेत शिक्षण घेऊन शेतकरी, कामगार, रोजगार आणि ग्रामीण – शहरी समस्या आणि त्याचे निरसन करावे. या उद्देशाने पत्रकारितेत सन 2021-22 मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर चारही सेमिस्टर मध्ये चांगले गुण मिळवत त्याने हे यश संपादन केले आहे.
26 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल रमेश बैस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील याची आभासी उपस्थिती होती तर परिक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक दिगंबर नेटके श यांच्यासह आदींची उपस्थिती होती. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड