नवी दिल्ली : – आयपीएलच्या 16 व्या मोसमाचा अंतिम सामना थोड्याच वेळात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या मोसमाचा विजेता कोण? अशी चर्चा रंगत असतानाच चेन्नईचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायडू याने निवृत्तीची घोषणा केली आहे. अंबाती रायडू याने ट्वीट करत निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. अंबाती रायडूने ट्वीटमध्ये लिहिले, CSK आणि गुजरात 2 सर्वोत्तम संघ, 2024 सामने, 14 हंगाम, 11 प्लेऑफ, 8 फायनल, 5 ट्रॉफी. आशेने आज रात्री सहावी. बराच लांबचा प्रवास झाला. मी ठरवले आहे की आज रात्रीचा आयपीएलमधील हा माझा शेवटचा सामना असेल. मला ही स्पर्धा खेळताना खूप आनंद झाला. तुम्हा सर्वांचे आभार. यू-टर्न नाही.
अंबाती रायडूने 2010 मध्ये आयपीएल करिअरला सुरुवात केली. चेन्नई सुपर किंग्स शिवाय त्याने
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा भाग आहे. 2018 पासून चेन्नई सुपर किंग्स कडून तो खेळत आहे.
त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 203 सामन्यांत 28.29 च्या सरासरीने 4 हजार 329 धावा केल्या आहेत.
रायडुने आयपीएलमध्ये 22 अर्धशतक आणि 1 शतक केले आहे.
तर 171 षटकार आणि 358 चौकार ठोकले आहेत. त्याशिवाय 64 झेला आणि 2 स्पपिंग त्याच्या नावावर आहेत. #सत्यप्रभा न्यूज