किनवट दि.२३: आज सकाळी 8:30वाजता किनवटकडून येणाऱ्या इंटरसिटी या रेल्वे गाडीत चढताना एक 25 वर्षीय युवक पाय घसरून रेल्वेखाली गेला आणि गंभीर जखमी झाला रेल्वे विभागामार्फत वेळोवेळी सूचना व अलाउंसमेंट केली जाते चालत्या व धावत्या ट्रेनमध्ये चढू नये उतरू नये पण या गोष्टीकडे प्रवासी दुर्लक्ष करतात आणि अशा घटना घडत असतात ही रेल्वे रेल्वे गाडी किनवट येथून सकाळी ठीक 8.30 वाजता सुरू झाली त्यावेळी गाडीत चढताना प्रयत्न करणारा युवक महेश कणके (अंदाजे वय 25)डब्यातील आजूबाजूच्या स्टीलचे रोड पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचे संतुलन बिघडले आणि तो रेल्वे खाली गेला रेल्वे स्थानकावर गर्दी नव्हती रेल्वेस्थानकातील लोकांनी आरडाओरडा व रेल्वेमधील लोकांनी आरडाओरडा केल्यानंतल गाडीचालकाने गाडी थांबवली परंतु तो प्रर्यंत उशीर झाला होता.जखमी युवकास तातडीने गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले,काही जणांनी सांगितले की त्यांचे दोन्ही पाय रेल्वेखाली कापले गेले. त्यांची अवस्था गंभीर आहे त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे पाठविण्यात आले. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड