नांदेड दि१८: महाराष्ट्र राज्य व्हेटरनस् अॅक्वेंटीक असोशिएशन, महाराष्ट्र यांच्या वतीने कोल्हापुर येथे आयोजीत 24 व्या राज्यस्तरीय मार्टस जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार जयप्रकाश मोतीराम क्षीरसागर, रामेश्वर राजकुमार जाधव व पवन मारोती चौदंते यांनी एकुण 10 पदक पटकावले.
महाराष्ट्र राज्य व्हेटरनस् अॅक्वॅटीक असोशिएशन, महाराष्ट्र यांनी कोल्हापुर येथे दिनांक 01 व 02 ऑक्टोबर रोजी 24 व्या राज्यस्तरीय मार्टस जलतरण स्पर्धेचे आयोजन सागर पाटील जलतरण तलाव येथे केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील विवीय जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत नांदेड जिल्हा संघात सहभागी असलेल्या नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार जयप्रकाश मोतीराम क्षीरसागर यांनी 50 मीटर फ्रीस्टाईल गोल्ड मेडल, 200 मीटर वैयक्तीक मीडले रीले गोल्ड मेडल, 200 मीटर सांघीक मिडले रीले मध्ये गोल्ड मेडल व 50 मीटर बटरफ्लाय सिल्वर मेडल असे एकुण तिन सुर्वण, एक रजत पदकांची कमाई केली तर पोलीस अंमलदार रामेश्वर राजकुमार जाधव यांनी 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात गोल्ड मेडल, 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात सिल्वर मेडल व 200 मीटर सांघीक मिडले रीले प्रकारात ब्रॉन्झ मेडल पटकावत एकुण तिन मेडल्सची कमाई केली. तसेच पवन मारोती चौदंते यांनी 50 मीटर बॅकस्ट्रोक गोल्ड मेडल, 50 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक सिल्वर मेडल व 200 मीटर सांघीक मिडले रीले प्रकारात ब्रॉन्झ मेडल पटकावले.
या यशाबद्दल नांदेड जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार, पोलीस उप अधीक्षक (गृह) श्रीमती अम्बिनी जगताप, राखीव पोलीस निरीक्षक श्री विजय धोंडगे, क्रीडा विभाग प्रमुख संतोष सोनसळे यांनी विजयी अंमलदारांचे कौतुक करून अभिनंदन केले.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड