हिमायतनगर प्रतिनिधी/-तालुक्यातील येथील रहिवासी रामकुमार वाघोजीराव ससाणे बोरगांवकर हे केंद्रीय राखीव पोलीस बल जम्मू काश्मीर खोऱ्यात कान्सटेबल म्हणून रुजू होते त्यांनी प्रामाणिक पने देशसेवा केल्या मुळे ६ ऑक्टोबर रोजी त्यांची केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या सहाय्यक उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती होऊन जम्मू काश्मीर येथे ते रुजू झाले आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की रामकुमार ससाणे बोरगांवकर हे अत्यंत गरीब कुटुंबातील असताना त्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी कष्ट घेऊन सैन दलात भरती झाले रामकुमार ससाणे बोरगांवकर यांचे आई, वडील, नसताना भावाच्या सहकार्याने शिक्षण घेत स्वबळावर देशसेवेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलात सहभागी होण्याचे आपल्या आई वडिलांचे व कुटुंबाचे स्वप्न त्यांनी पूर्ण करण्याचे योजिले होते , सुरुवातीपासून त्यांना देश सेवा करण्याची आवड असल्याने त्यांनी १९९८ मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलात त्यांची निवड झाल्या पासून त्यांनी देशाचे प्रामाणिक पने सेवा केली ते पोलिस कान्सटेबल असताना त्यांना हेड कॉन्स्टेबल पदा वरून पदोन्नती मिळाली आहे ,त्यामुळे प्रामाणिकपणे देशसेवेचे काम केल्यामुळे नुकतीच रामकुमार ससाणे बोरगांवकर यांची केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या सहाय्यक उपनिरीक्षक पदी त्यांची पदोन्नती झाली त्यांच्या या पदोन्नतीबद्दल हिमायतनगर तालुक्यातील त्यांच्या मित्र परिवारासह ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून ठीक ठिकाणी त्यांचा सत्कार केला जात आहे. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड