मुंबई | स्वातंत्र्यवीर सावरकर यांची 140 वी जयंती रविवारी (दि.28) संपूर्ण देशात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने दिल्लीमधील महाराष्ट्र सदनात सावरकरांची जयंती साजरी केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रातील अनेक नेते उपस्थित होते. राज्यातील तसेच केंद्रातील अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी सोशल मीडियावर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, उद्धव ठाकरे यांनी वीर सावरकर यांच्या जयंतीचा विसर पडल्याची टीका भाजपने केली आहे.
मुंबई भाजपने ट्विटरवर एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपने उद्धव ठाकरे यांचे दोन फोटो शेअर केले आहेत. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या फोटोंना अभिवादन करतानाचे उद्धव ठाकरे यांचे दोन फोटो भाजपने शेअर केले आहेत. ऑप्शन मध्ये लिहिले आहे की, काँग्रेसला खुश करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची लाचारी, गांधी परिवरांची जयंती साजरी करणाऱ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा पडला विसर, असे लिहिण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल गौरवोद्गार काढताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, हिंदू समुदायाच्या सर्व घटकांमध्ये अधिक संघटन, एकजूट वाढवून शक्तिशाली आणि एकजिनसी समाज निर्माण करणे,
हिंदू समाजात शिक्षणाचा प्रचार करणे, हिंदूंमधील कुठलाही घटक असू दे त्यात भेदभाव न होता त्याची स्थिती सुधारून
त्याचं आयुष्य सुखावह करणे आणि जेंव्हा गरज निर्माण होईल तेंव्हा हिंदू हिताचं संरक्षण आणि
संवर्धन करणं हे 1937 नंतर सावकारांच्या आयुष्याचं ब्रीद झालं. सक्रिय हिंदू संघटक;
पण त्याचवेळेस क्रियाशील धर्मसुधारक व समाजसुधारक; प्रेरणादायी महाकवी आणि विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता याबाबत
प्रखर विचार मांडणारे विचारवंत म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. आज त्यांची जयंती. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड