लातूर प्रतिनिधी | विजय पाटील|
रेणापुर : दि १२/०९/२०२३
रेणापूर येथे सरसकट मराठा ओबीसी आरक्षणासाठी तालुक्यातील मराठा समाज सर्व पक्ष.संघटना.सर्व मतभेद सोडुन सकल मराठा समाज रेणापुर यानावाने एकजुटीने आरक्षणासाठी मैदानात उतरला असुन काय वाट्टेल ते करु मात्र सरसकट मराठा ओबीसी आरक्षण जिंकून घेऊ असा ठाम शिवनिर्धार करून छत्रपती शिवराय चौक रेणापुर येथे योगेश देशमुख. अजय गाडे. संतोष शिंदे.धनंजय भोसले हे गेल्या आठवड्यापासून उपोषणाला बसले आहेत त्यांना पाठींबा देण्यासाठी सर्व गावातील ग्रामपंचायत ठराव घेऊन सरपंच येत आहेत आमदार. जि प सदस्य.सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी पाठींबा देत आहेत त्याच प्रमाणे आज संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक उमाकांत उफाडे यांनी उपोषणात सहभागी होऊन मार्गदर्शन करून आंदोलनास जाहीर पाठींबा दिला यावेळी संभाजी ब्रिगेड महानगर अध्यक्ष मिथुन दिवे. जिल्हा सचिव रफिक शेख यांनी अधिकृत पाठींबा पत्र रीतसर सुपूर्द केले यावेळी संधर्षपीठावर सुधाकर माने. सचिन दाने. कुलदीप सुर्यवंशी.अॅड श्रीकांत सुर्यवंशी धनसरगावकर. डि.एस. पाटील कामखेडकर. संतोष चव्हाण. तुकाराम शिवनकर यांच्या सहित शेकडो समाज बांधव सहभागी होते. आज संपूर्ण रेणापुर तालुक्यातील गरसोळी. पळशी. पाणगाव. कामखेडा. मोटेगाव. हारवाडी .समसापुर. बावची. निवाडा . अशा गावागावातुन मोटरसायकल रॅली काढून हजारो तरुण.. आरक्षण आमच्या हक्काच .. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे घोषना देत रेणापुर येथे उपस्थित होते यावेळी पुढील दिवसात आंदोलन अजून आक्रमक पध्दतीने करून रास्ता रोको. लोकप्रतिनिधी ठोको असे वाट्टेल ते करु मात्र सरसकट मराठा ओबीसी आरक्षण जिंकून घेऊ असा ठाम शिवनिर्धार मराठा समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आला.
सत्यप्रभा न्यूज