हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- तालुक्यातील मौजे पवना येथील दोन युवक नाव संदेश राहूलवार व योगेश अंगीलवार वय वर्ष अंदाजे 25 ते 30 हे त्यांच्या मोटार सायकल क्रं MH 26 BH 6288 ने सोनारी फाटा मार्गे हदगाव कडे जात असताना जवळगाव ते सोनारी फाटा दरम्यान आज दि 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता त्यांची दुचाकी घासरून गंभीर अपघात झाला तेव्हा जवळगाव वरून हिमायतनगर कडे येणारे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या निदर्शनास रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दोन युवक दिसताचशनी आमदार साहेबांनी तात्काळ प्रशासकीय यंत्रणा व कार्यकर्त्यांना बोलवून कार्य तत्परता दाखवत घटना स्थळी एक ऑटो बोलाऊन त्यां रुग्णांना हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले ते दोन्ही युवक गंभीर जखमी असल्याचे उपचारा दरम्यान समजताच हिमायतनगर येथील काँग्रेस शहर अध्यक्ष संजय माने यांनी त्या रुग्णांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठवले असल्याचे सांगण्यात आले….