हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- येथील पोलीस स्टेशन येथे गुरण 275/22 कलम 224 IPC मधील आरोपी नामे नामदेव रामचंद्र दिवसे यास पोलीस स्टेशन येथील महिला सपोउपनी श्रीमती कागणे मॅडम पो.हे.का. १२७२ नागरगोजे पो.ना. ८९५ चौदंते यांनी येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष मा.पोलीस निरीक्षक श्री भूसनूर साहेब यांच्या मार्गदर्शना खाली मध्यवर्तीय कारागृह छत्रपती संभाजीनगर येथून गुरन 51/12 कलम 302,34 भादवि जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आरोपीस कारागृहातुन कोरोना आकस्मीत अभीवचन रजेवर येऊन दि.09/11/2020 रोजी 45 दिवसांकरीता रजेवर गेले होते परंतु शासनाच्या आदेशाने कोवीड-19आपत्कानील रजा रद्द करण्यात आल्याने त्यास दिनांक 19/05/2022 रोजी हजर होणे अपेक्षित होते परंतु सदर आरोपी हा कारागृहात न जाता तो फरार झाला होता त्याला पकडण्यात हिमायतनगर पोलिसांना आले यश
या बाबत सविस्तर वृत्त असे की पोलीस अधिक्षक कार्यल नांदेड सायबर ब्रॅंच येथील HC1242 राजु शिटीकर यांचे मदतीने फरार आरोपीस मोठ्या शिताफतीने तेलंगाना राज्यातील आरमोर पेरकीट येथुन ताब्यात घेवुन त्यास अटक केली सदर आरोपी तेलंगणा राज्यात नावं बदलून राहत होता त्यामुळे असे येथील पोलीस निरीक्षक बी डी भुस नुर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले त्यामुळे नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक साहेब ,मा.अपर पोलीस अधिक्षक साहेब भोकर, मा.सहा.पो.अ.भोकर यांनी हिमायतनगर येथील पोलिसांची व सायबर सेल मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले..