👉🏻अंतर्गत येणाऱ्या एकघरी सह 4 ठिकाणच्या पोलुची काम तात्काळ मार्गी लावा अशी गावकऱ्यांची मागणी…
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-महाराष्ट्र आदिवासी विभाग मंत्री विजय कुमार गावित यांच्या कडे मागील काही दिवसा पूर्वी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी तथा शिवसेना आदिवासी तालुका प्रमुख सत्यव्रत ढोले यांनी या आदिवासी भागातील वाशी ते हिमायतनगर रस्ता क्रं 108 अंतर्गत येणाऱ्या एकघरि, पार्डी,वाशी, चीचोर्डी सह हिमायतनगर येथील चार पुलांच्या बांधकामासह रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे येन पावसाळ्यात थोडे जरी पाणी पडले तर या गावांचा शहराशी संपर्क तुटतो त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत होत आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे सह हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांनी आमच्या भागासाठी तात्काळ 15 कोटीचा निधी देऊन येथील नागरिकांच्या अडचणी दूर कराव्या अशी मागणी सत्यव्रत ढोले सह येथील नागरिकान कडून होत आहे…
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील बहुतांश भाग हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो ह्या भागातील वाशी, एकघरी, चीचोडी , महादापुर सह पार्डी भागात बहुतांशी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने राहतात ह्या भागातील नागरिकांना वाशी ते हिमायतनगर येण्या साठी 15 किमी चा प्रवास करून यावे लागते त्यामुळे ह्या भागातील अनेक रस्ते पावसाच्या पाण्यात खराब झाले आहेत ह्या रस्त्याला महाराष्ट्र सरकार ने 108 क्रमांक देऊन सुद्धा ह्या रस्त्यावरील 4 पुलांची दुरुस्ती अद्याप करण्यात आली नाही पावसाळ्यात या भागात जरा जरी पाऊस पडला तर त्या पुलावर पाणी साचून येथील नागरिकांचा शहराशी संपर्क होत नाही त्यामुळे नागरीकांचे जनजीवन विस्कळीत होत आहे ह्याच भागातील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी तथा शिवसेना आदिवासी तालुका प्रमुख सत्यव्रत ढोले यांनी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे आदिवासी मंत्री यांच्या कडे 15 कोटीची मागणी केली होती त्या मागणीला गावित साहेबांनी काही दिवस पूर्वी हिरवी झेंडी देत येत्या अर्थ संकल्पात निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले होते पण अद्याप ह्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली नाही त्यामुळें मागील अनेक दिवसापासूनची प्रलंबित मागणी तात्काळ मंजूर करून येथील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी सत्यव्रत ढोले सह येथील गावकऱ्यांनी केली आहे