हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरातील अविनाश देशपांडे यांचे चिरंजीव अभिजीत यांना नुकतीच सप्तसोम संस्थासु प्रयुक्तानां साम्नां समीक्षात्मकमध्ययनम् या विषयात एचडी प्रधान झाली आहे त्यांच्या या यशाबद्दल डॉ. प्रा.गिरीजा प्रसाद षडंगी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
अभिजीत यांचे प्राथमिक शिक्षण – बार्शिच्या प्रसिद्ध असलेल्या नाना काळेंच्या गुरुकुलात झाले आहे त्यानंतर त्यांनी श्री वेंकटेश्वर वैदिक यूनिवर्सिटी तिरुपति इथून बि.ए.मए. आनी पीएचडी डॉक्टर श्री गिरिजाप्रसाद षडंगी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्ष खडतर मेहनत घेत आपल्या गरीब परिस्थितीची जाणीव ठेवून अभिजीत ने सप्तसोम संस्थासु प्रयुक्तानां साम्नां समीक्षात्मकमध्ययनम् या विषयातील संस्कृत मध्ये पीएचडी मिळवली आहे त्यांच्या या यशाबद्दल हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत भाऊ पाटील, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर सह माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, लोकनेते बाबुराव कोहळीकर सह माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, गजानन चायल, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आशिष सकवान, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, सह पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता भाऊ शिराणे,नागेश शिंदे सह ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष व त्यांच्या वडिलांनी अभिजीत चे पुष्पहार घालून अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…