नांदेड दि २२: माहूर आणि आसपासच्या परिसरात काल रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने माहूर,किनवट आणि सहस्त्रकुंड धबधबा आणि इतर पर्यटन क्षेत्रांना जनतेने पुढील दोन चार दिवस जाऊ नये असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने ट्विटरवर प्रसारित केली आहे.धनोदा ते किनवट कडे जाणाऱ्या पुलावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.माहूर जवळ टाकळी गावात पुरात अडकलेल्या जनतेला बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने पथके रावना केली आहेत.किनवट येथील मोमीनपुरा वस्तीत पाणीच पाणी झाले आहे.त्या ठिकाणच्या ८० लोकांना उर्दू शाळेत हलवण्यात आले आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड