मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आज राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होत आहेत. या घटनेमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात २०१४ नंतर तिसऱ्या विरोधी पक्षनेता सरकारमध्ये झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनंतर आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. २०१४ पासून तीन विरोधी पक्षनेते सरकारमध्ये
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन टर्ममध्ये तीन विरोधी पक्षनेते राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील सहभाग झाले होते. तर, आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये अजित पवार सहभागी होत आहेत. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड