हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- तालुक्यातील सवना ज येथील श्नीमती सखुबाई देवराव गायकवाड यांनी पोलिसासह दारू बंदी खात्याला न जुमानता निजामशाही काळापासून चळवळींचे गाव म्हणून तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या सवना ज गावात दररोज तीन चार दारुचे बॉक्स बेधडकपणे रात्रंदिवस २४ तास तास विक्री करुन शांतता प्रिय नागरिकांसह महिलांना त्रासुन सोडले होते.१८ आक्टोबर रोजी दिवसा ढवळ्या पोलिस निरिक्षक बिरप्पा भुसनूर,सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार रोहन सरकुडे यांनी बेधडकपणे श्नीमती सखुबाई देवराव गायकवाड यांच्या घरात धाड टाकून देशी दारू सह त्या महिलेला ताब्यात घेऊन पोलिस गाडीत नेऊन कारवाई केली आहे.
या दोन वर्षांत चौथी कारवाई असुन त्या महिलेच्या दारू विक्री मुळे गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे सदर महिलेस सवना ज गावातुन हदपारीची कारवाई करावी अशी मागणी सरपंच, उपसरपंच ग्रा.प.सदस्यासह महिला वर्गातुन होत आहे.पोलीस निरीक्षक बिरप्पा भुसनूर यांच्या कर्तबगारीचा गौरव महिलांनी केला आहे.नवरात्र महोत्सवात पोलिस निरिक्षक भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, पोलिस जमादार रोहन सरकुडे यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे महिला भगिनींनी देशोन्नती शी बोलताना सांगितले. सवना ज हे चळवळींचे गाव असून गेल्या तीन वर्षांपासून येथील सखुबाई देवराव गायकवाड यांनी अनधिकृतपणे देशी दारू चे दुकान सुरू केल्यामुळे या गावासह परिसरातील पिणा-याचा लोंढा गावात येत असल्यामुळे हनुमान मंदीरा पासुन दहा कि मी अंतर असल्याने भाविकांसह शेजारी आणि गावकऱ्यांना पिणा-या पासुन होणा-या मानसीक त्रासाचा सामना करावा लागत आहे.काही महिन्यापर्वी महिला मंडळांनी थेट पोलिस स्टेशनला पोलिस निरिक्षक बिरप्पा भुसनूर यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.त्यावेळी मुद्देमालासह त्या महिलेवर कारवाई करण्यात आली होती. गावागावात नवरात्र महोत्सव जोरात सुरू असुन सवना ज येथील हनुमान मंदीराला लागुन सार्वजनिक दुर्गा देवी ची स्थापना करण्यात आली आहे. अशा धार्मिक काळात ही सखुबाई गायकवाड यांनी अनधिकृतपणे देशी दारू विक्री सुरुच ठेवल्यामुळे भाविक माताना त्रासाचा सामना करावा लागत आहे.सत्यचित्र पोलिस निरिक्षक बिरप्पा भुसनूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाला चौधरी यांना समजल्यावर १८ आक्टोबर २०२३ रोजी पोलिस जमादार रोहन सरकुडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलींद कात्रे,गृहरक्षक दलाचे जवान शेख मुसा यांनी सवना ज येथे भेट देऊन त्या महिलेच्या घरातुन दारू जप्त करुन दारुसह सदर महिलेला पोलिस स्टेशनला नेऊन कारवाई केली आहे.महिला वर्गातुन पोलिसांच्या कारवाईचे समाधान व्यक्त केले जात आहे.यापुर्वीच्या त्या महिलेवर झालेल्या कारवाईची नोंद पाहुन त्या महिलेवर हदपारीची कारवाई करण्याची मागणी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांच्या सह महिला, पुरुषांनी केली आहे.