हिमायतनगर प्रतिनिधी/- पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. ५ जून हा ‘जागतिक पर्यावरण दिन’म्हणून साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधून आज नगरपंचायत कार्यालय प्रांगणात पर्यावरण संरक्षणाच्या गरजेबद्दल जनजागृति करण्याच्या उद्देशाने कार्यालयीन अधीक्षक चंद्रशेखर महाजन साहेब व माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला
याबाबत सविस्तर वृत्त असे की १९७३ मध्ये पहिल्यांदा पर्यावरण दीन साजरा करण्यात आला होता त्यानतंर आज दि 5 जून रोज २०२३ मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे ५० वे वर्ष म्हणून येथील नगरपंचायत कार्यालयाच्या आवारामध्ये जागतिक पर्यावरण दीन साजरे करण्यात आले यावर्षी ‘ऑन सोल्युशन टू प्लास्टिक पोल्युशन’ हा विषय महाराष्ट्र सरकारने निश्चित केला गेला आहे त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाचे कार्यालयीन अधीक्षक चंद्रशेखर महाजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक पाच जून रोजी नगरपंचायत कार्यालय प्रांगणात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई,कार्यालय अधीक्षक चंद्रशेखर महाजन, अभियंता रमाकांत बाच्छे, मारोतराव हेंद्रे,बालाजी हरडपकर,विठ्ठल शिंदे यांच्यासह येथील नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते