हिमायतनगरः मागच्या काही दिवसांपासुन हिमायतनगर तालुक्यात सारखा मुसळधार व ढगफुटीसदृष्य पाऊस सुरु आहे. शेतकरी चिंताग्रस्त आहे. खुप मेहनतीने व कर्जबाजारी होऊन काहींनी एकदा तर काहींनी दोनदा पेरणी करुन जमिनीच्यावर आलेलं पीक या मुसळधार पावसाने धुवुन नेले. त्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीला धावुन येण्याची व त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहण्याची ही खरी वेळ आहे. सद्या सुरु असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट ६०००० रुपयाची आर्थिक मदत घोषित करावी व सरकार हे शेतकरी हिताचे आहे हे सिद्ध करावे.
हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घाबरुन जावु नये काँग्रेस पक्ष आपल्या कायम पाठिशी आहे. शेतकऱ्यांना मदत मिळवुन देण्यासाठी काँग्रेस पक्ष सरकारला भाग पाडेल. असे मत हिमायतनगर काँग्रेस कमिटी अनुसुचीत जाती विभागाचे तालुकाअध्यक्ष,संतोष आंबेकर यांनी व्यक्त केले आहे. # सत्यप्रभा न्यूज #नांदेड