सखोल चोकशी करून कारवाईची करण्याची पाथरड येथील शेतकऱ्यांची तहसीलदाराकडे मागणी.
जिल्हा मध्यवर्ती तामसा शाखेतील प्रकार
हदगाव प्रतिनिधी:नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक,शाखा तामसा,येथे शेतकऱ्यांच्या नावावर आलेल्या रकमेची यादी संबंधित शाखा अधिकारी दाखवीत नसून प्रत्येक खातेदारांकडून कोऱ्या स्लीपवर सही घेऊन,रक्कम न टाकता, त्या स्लीपवरच पैशांचे वाटप करून फसवणूक होत असल्याची तक्रार एका शेतकऱ्यांनी तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.पाथरड येथील शेतकरी रमेश मारोतराव पवार हे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खातेदार आहेत. त्यांच्या नावावर आलेली रक्कम एकूण किती आहे असे त्यांनी येथील शाखा अधिकारी बारशे यांना विचारले असता, त्यांनी केवळ स्लीपवर रक्कम न टाकता सही करून द्या व नंतर पैसे मिळतील असे सांगितले. परंतु सदरील स्लीपवर एकूण किती रुपये खात्यात वर्ग झाले आहेत, हे सांगण्यास मात्र त्यांनी टाळाटाळ केली.यामुळे चालू बाकीदार शेतकऱ्यांच्या नावावर आलेली रकमेची यादी बँकेत दर्शनी भागात लावण्यात यावी व आतापर्यंत किती शेतकऱ्यांना च्या कोऱ्या स्लिप वर यांनी सह्या घेतल्या आणि किती जणांना योग्य रक्कम वाटप केली की नाही याची चोकशी करून व यामध्ये काही भ्रष्टाचार आढळल्यास शाखाधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी तहसीलदार विनोद गुंडमवार यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे.
या निवेदनावर रमेश पवार, भीमराव पवार, संतोष पवार, बालाजी पवार, धोंडबाराव मारोतराव पवार आदींच्या स्वाक्षरी आहेत. #सत्यप्रभा न्यूज # नांदेड