हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- किनवट तालुक्यातील मौजे शिवनी परिसरात दिनांक 19 जून च्या मध्यरात्री काही गौरक्षकावर अज्ञात कसायांनी सशस्त्र हल्ला करून एकाचा खून केला आहे या घटनेचा हिमायतनगर शहरातील हिंदू संघटनांनी जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी दिनांक 21 जून 2023 रोजी हिमायतनगर शहर बंदची हाक देत विश्व हिंदू परिषद व बजरंग दल , गौरक्षक व सकल हिंदू समाज बांधव संघटनेच्या वतीने हिमायतनगर येथील तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना दि 20 जून रोजी एक लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे…
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि 19 जून च्या मध्यरात्री शिवनी इस्लापूर परिसरात एका गौरक्षकावर हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे येत्या काही दिवसात बकरी ईद येत असल्याने नांदेड जिल्ह्यात जोरात गो हत्या सुरू आहे बकरी ईद निमित्त मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात गोवंश खरेदी करून घरात व शेतातील आखाड्यावर बांधलेले आहेत विनापरवाना गोहत्या तस्करी मोठ्या प्रमाणात चालू आहे या निमित्त शिवनी येथील पाच गौरक्षक या घटनेची माहिती देण्याकरिता गेले असता त्यांच्यावर काही मुस्लिम समाजकंटकांनी धारदार शस्त्राने प्राण घातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहेत त्यात एक गोरक्षकाचा जागीच मृत्यू झाला व इतर चार जनावर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे असच काहीसं प्रकार मागील 4 दिवसापूर्वी हिमायतनगर तालुक्यातील विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री किरण भाऊ बिच्छेवार यांच्या वर झाला होता त्यात पोलिसांच्या कार्य तत्परतेमुळे त्यांचे प्राण वाचले पण नांदेड जिल्ह्यात असे प्रकार वारंवार होत आहेत त्यामुळे हिमायतनगर येथील बजरंग दल व विश्व हिंदू परिषद, गौरक्षक व सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीने उद्या दिनांक 21 जून 2023 रोजी हिमायतनगर शहर बंदची हाक देण्यात आली आहे या सर्व घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागण्यासाठी आज दिनांक 20 जून रोजी हिमायतनगर येथील बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर येथील तहसीलदार व हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना एक लेखी निवेदन देऊन हिमायतनगर बंदची हाक देण्यात आली आहे
यावेळी बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल, ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,बंडू भाऊ अंनगुलवार,गणेश रामदीनवार, नागेश शिंदे,सुधाकर चिठ्ठेवार,गजानन गायके,सावन रावते,शुभम नरवाडे,बबलु डांगे,हनुमान अरेपल्लू,शीतल सेवनकर,पामु नागेवाड सह असंख्य बजरंग दल चे कार्यकर्ते व सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..