नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या गट क्र.५ जागेवर बेकायदेशीर रित्या अतिक्रमण करून घराचे बांधकाम केले जात असल्याने कोणत्या कागदपत्रा आधारे बांधकाम करीत आहेत.याची माहिती देण्यात यावी.अन्यथा बेकादेशीर बांधकाम थांबवावे यासाठी अनेक दिवसा पासून पाठपुरावा उपोषण करून देखील न्याय मिळाला नसल्याने वैतागलेले लिंगापुरचे उपसरपंच हानमंत तडखेले यांनी ३० मे रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद नांदेड यांना अर्ज देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिले आहे.
मुखेड तालुक्यातील लिंगापूर येथील महाराष्ट्र शासनाच्या गट क्र.५ या जागेवर गावातील पांडुरंग भगवान तडखेले यांनी बेकायदेशीर रित्या अतिक्रमण करून ती जागा नमुना नं ८ ला लावून त्या जागेवर घराचे बांधकाम करीत आहेत.त्यामुळे कोणत्या कागदपत्राच्या आधारे ती जागा नमुना नं ८ ला लावण्यात आले.याची गावातील सुजाण नागरिकांनी अनेकवेळेस पंचायत समिती मुखेड व ग्रामसेवक यांना लेखी अर्ज देवून विचारणा केली आणि कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
त्यासाठी उपोषण देखील करण्यात आले होते. तेव्हा गटविकास अधिकारी यांनी १० दिवसात पुरावे सादर करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे म्हणून हाणमंत तडखेले यांना उपोषणापासून परावृत केले होते.मात्र अध्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याने ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांनी मला ३ दिवसात नमुना नंबर ८ कशाच्या आधारे लावली हे कागदपत्रे देतो म्हणून उपोषणातून माघार घ्यायला लावून माझी दिशाभूल केली आहे.असे अर्जात नमुद करून ग्रामसेवकाने कोणत्या कारणाने पुरावे दिले नाही. त्यामुळे ग्रामसेवकास दोषी ठरवून निलंबित करावे अशी मागणी केली.अन्यथा १५ जून रोजी ११ वाजता जिल्हापरिषदे समोर आत्मदहन करणार असल्याचे अर्जाद्वारे सांगितले. #सत्यप्रभा #नांदेड