जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या आढावा बैठकीत प्रतिपादन
हिमायतनगर : नांदेड जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा व तालुका पदाधिकार्यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.बैठकीस जिल्हा प्रभारी बालाजीराव कांबळे लातुर,प्रदेश सरचिटणीस अॕड.सुरेंद्र घोडजकर,डाॕ.गंगाधर सोनकांबळे,जिल्हा सचिव उमाकांत पवार यांनी मार्गदर्शन केले.
आगामी सर्व निवडणुकामध्ये जातियवादी शक्तींना रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष मताचे ध्रुवीकरण होणार नाही याची दक्षता घेऊन संविधानाचे रक्षण करण्याची जवाबदारी आपल्या विभागाच्या पदाधिकार्यांची असल्याचे मत जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार यांनी व्यक्त केले.
तर आपले नेते राहुल गांधींची “नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान ” ही संकल्पना समाजात,गावागावात,वस्ती, तांड्यात रुजवण्यासाठी आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेहनत घेणे गरजेचे आहे.तसेच राज्यात ज्या पद्धतीने आमच्या महापुरुषांची बदनामी काही समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांकडुन चालु आहे. ज्यामुळे समाजात अस्थिरता पसरत आहे. अशा शक्तींना लगाम घालण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.अन्यथा पुरोगामी महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असे मत हिमायतनगर तालुकाध्यक्ष संतोष आंबेकर यांनी व्यक्त केले.
तालुक्याचा आढावा मांडताना आंबेकर पुढे म्हणाले कि, जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार साहेब यांच्या नेतृत्वात आमची हिमायतनगर तालुक्यात जोरदार पक्षबांधणी चालु आहे. लवकरच तालुका कार्यकारिणी विस्तार व काही गावांच्या शाखांची घोषणा करण्यात येणार आहे. आमच्या सर्व उपक्रमांना हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे आमदार मा.माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य नेहमी असते. असेही ते म्हणाले.
या बैठकीस कपील कांबळे, विकास गाडेकर, पवन बनसोडे आदी हिमायतनगर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.प्रारंभी डाॕ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापुजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.सुत्रसंचलन अशोक गोणारकर यांनी केले तर अनिल कांबळे यांनी आभार मानले. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड