मुंबई- नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाली. त्यासाठी रायगडावर मोठा सोहळा साजरा करण्यात आला. मोठाला मंडप, छत्रपतींच्या मूर्तीची पूजा, ढोल ताशे सगळंच पाहण्यासारखं होतं. संपूर्ण महाराष्ट्रातून शिवभक्त आपल्या लाडक्या राजाला अभिवादन करण्यासाठी इथे आले होते. ६ जून रोजी रायगडावर तब्बल ४ लाखांहून अधिक शिवभक्त हा सोहळा अनुभवण्यासाठी आले होते. एकीकडे सगळ्यांचं लक्ष रायगडावर असताना मराठमोळी अभिनेत्री थेट स्वराज्याच्या तिसऱ्या राजधानीत पोहोचली होती. तिने तिथला एक व्हिडिओही शेअर केला. या व्हिडीओत ती त्या किल्ल्याचं महत्व आणि शिवरायांचा पराक्रम सांगताना दिसतेय. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून चित्रपटसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी आहे.
सोनाली तिच्या वाढदिवसानिमित्त तुर्की येथे सुट्ट्या घालवण्यासाठी गेली होती. तिने तिथले अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. मात्र आता ती भारतात परत आली आहे आणि शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत ती थेट जिंजी किल्यावर पोहोचली आहे. तिने ८०० फूट उंचावर असलेल्या जिंजी या किल्ल्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. नऊवारी साडी, नाकात नथ, केसात गजरा माळून सोनाली थेट जिंजीवर पोहोचली आणि या व्हिडिओमध्ये ती आपला इतिहास सांगताना दिसतेय. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं, ‘राज्याची पहिली राजधानी राजगड आणि दुसरी राजधानी रायगड हे सर्वांनाच माहिती आहे. पण आज छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनी मी आहे स्वराज्याच्या तिसऱ्या राजधानीत. अर्थातच जिंजी येथे. ज्याला महाराजांनी ‘भारतातील सर्वात अभेद्य किल्ला’ म्हणून स्थान दिले आणि ब्रिटिशांनी त्याला ‘ट्रॉय ऑफ द इस्ट’ असे संबोधले.’ जिंजी किल्ल्याबद्दल
६ जून १९७४ मध्ये झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिम आखली होती. ज्यात तमिळनाडू येथे असलेला ८०० फूट उंचीवरचा जिंजी किल्ला मोठ्या पराक्रमाने काबीज केला आणि हाच जिंजी किल्ला महाराजांची तिसरी राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला.
लग्नानंतर रसिका सुनीलला जास्त आवडू लागली साडी, म्हणाली- मी विचारांनी जास्त बोल्ड #सत्यप्रभा न्यूज # नांदेड