नांदेड दि.१४: गणेशोत्सवानंतर नवरात्रीसाठी नांदेड येथे मूर्तिकारयांनी घरगुती मुर्त्या बनवून मोठ्या मुर्त्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवून देवीच्या आगमनासाठी तयार केल्या.
गणेशोत्सव नंतर महाराष्ट्रात नवरात्री उत्सवाला उद्यापासून सुरुवात होत असून सर्वांना आतुरता असणाऱ्या देवीच्या मुर्त्या बनवण्याच्या सर्वात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या मूर्तिकाराने पीओपी व शाडूच्या मिश्रणातून अतिशय आकर्षक अशा लहान व मोठ्या आकाराच्या मुर्त्या तयार केल्या आहेत घरगुती मुर्त्या तयार असून मोठ्या आकाराच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात पूर्ण करून नांदेडकरांसाठी शिवराज बनवणे व अनिल सिंहपरमार यांनी रवी नगर येथे शेवटच्या मुर्त्यांवर शेवटचा हात फिरून सज्ज झाले आहेत.
नांदेडमध्ये आठ इंचापासून ते 11 फुटापर्यंतच्या मुर्त्या साकारल्या असून पाचशे रुपयांपासून चाळीस हजारापर्यंत असणाऱ्या मुर्त्यांना प्रचंड मागणी असून अनिल यांच्या साडेतीन लाखाच्या मुर्त्या विकल्या व त्यांचा वीस वर्षांपासून हा व्यवसाय दिवसेंदिवस प्रगती होत आहे आणि सिंह परमात यांच्याकडे सर्वाधिक मागणी असणारी अंबा देवीची मूर्ती असल्याचे सत्यप्रभाशी बोलताना सांगितले तसेच त्यांच्याकडे 42000 ची अतिशय सुंदर अशी शिवमुर्ती आहे. त्याचबरोबर दुर्गा रेणुका महालक्ष्मी अन्नपूर्णा महाकाली संतोषी अंबादेवी अशा देवीच्या मुर्त्या तयार आहेत.
अनिल सिंहपरमात व सुनील सिंहपरमात
उत्पन्न चार लाख,गेल्यावर्षी साडेचार लाख
2003 पासून व्यवसाय
पंधरा कामगार
शिवाजी महाराज महाराणा प्रताप इत्यादी पेंटिंग
साहित्य: पीओपी आणि शाडूच्या मातीपासून मूर्ती
मार्केट: आंध्र प्रदेश, लातूर, तेलंगणा, शहरासह नांदेड शहर
सर्वात मोठी मूर्ती अंबादेवी,
माऊली देवी सहा हजार
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड