👉🏻 हिमायतनगर शहरातील माळी समाज बांधवांकडून घटनेचा निषेध…
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर बंदी आणून लेखकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिमायतनगर येथील माळी समाज बांधवां सह गावकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येथील तहसीलदार यांना एक लेखी निवेदन देऊन केली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की”इंडिक टेल्स’ नामक मनुवादी वृत्ती असलेल्या वेबसाईटवर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक, आद्य समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आलेलं आहे. सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अतिशय अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अत्यंत वेदनादायी आहे. छत्रपती-फुले-शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा निंदनीय प्रकार अतिशय संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा हिमायतनगर येथील समस्त माळी समाज बांधवां सह नागरिकांनी तीव्र निषेध करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणाऱ्यावर महाराष्ट्र शासनाने गांभीर्याने दखल घेऊन ‘इंडिक टेल्स या वेब साईट वर व लेखकावर अतिशय कठोरात कठोर कायदेशीर कार्यवाही करावी सदरील लेखकास अटक न केल्यास हिमायतनगर येथील माळी समाज बांधवां कडून लोकशाही चा अवलंब करून सदर प्रकरणा विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मागणी दि 1 जून रोजी येथील तहसीलदार व पोलीस प्रशासनास लेखी निवेदन देऊन करण्यात आली आहे..
यावेळी सुभाष जीवनाजी शिंदे, मायंबा लक्ष्मणराव होळकर ,शामसुंदर ढगे दिगंबर देवराव काळे, सावन रावते, मनोहर तुकाराम जाधव, परमेश्वर जाधव,गजानन चायल, परमेश्वर बबलू काळे, अनिल नाईक, गणेश दळवे,राजेश हेंद्रे,अंकुश दळवे,रामदास हेंदे,विजय शिंदे, भरत हेंद्रे,भारत डाके,आदर्श हेंद्रे, सह समस्त माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…