👉🏻तालुक्याचा सरासरी 82.96 टक्के निकाल…
हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्याचा दहावीचा सरासरी निकाल 82.96 टक्के लागला असून राजा भगीरथ मा. व उच्च मा.विद्यालयाचा विद्यार्थी ऋषीकेश संतोष साबळकर याने दहावी मध्ये 97 टक्के गुण घेवून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे त्याच्या या यशाचे कौतुक हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर,लोकनेते बाबुराव कोहळीकर सह गंगाधर पाटील यांनी केले आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की राजा भगीरथ शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुक्यात प्रथम येण्याची परंपरा या वर्षी पण कायम ठेवत संकेत घुले 95.80 टक्के घेवून तालुक्यात द्वितीय, प्रतिक राठोड 94.60 टक्के गुण घेवून तालुक्यात तृतीय आला आहे त्याच बरोबर तालुक्यातून परीक्षेला बसलेले परीक्षार्थी 1127 त्यापैकी डिस्टीक्शन 143, प्रथम श्रेणी 340, द्वितीय श्रेणी 307 तृतीय श्रेणी 145 असे एकूण 935 विद्यार्थि उत्तीर्ण झाले आहेत हिमायतनगर तालुक्यातील शाळा निहाय निकिल खालील प्रमाणे राजा भगीरथ मा. व उच्च मा. विद्यालय हिमायतनगर 79.72 टक्के, कै. महादजी पाटील विद्यालय कांडली 90.90, हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळा हिमायतनगर 86.20 जि.प. हा. हिमायतनगर 53.34, कै. श्रीधरराव देशमुख विद्यालय सरसम 90.90, आश्रम शाळा एकघरी 85.18, परमेश्वर विद्यालय विरसणी 98.50, आश्रम शाळा दुधड 87.61, ममिषा आश्रम शाळा पोटा 83.72, हुतात्मा शाळा खडकी83.33, कै. शेषराव आश्रम शाळा महादापूर जिरोना 80. 76, राजा भगीरथ विद्यालय धानोरा 85.41 , माध्यमिक विद्यालय 50 , जि.प.हा. जवळगाव 86.20, जि.प. हा. कामारी 90.90 , हाजी आदमजी उर्दू शाळा हिमायतनगर 82.92 , मातोश्री शेखावत आश्रमशाळा हिमायतनगर 62.06 टक्के निकाल लागला आहे या सर्व गुणवंताचे अभिनंदन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, गंगाधर पाटील चाभरेकर ,लोकनेते बाबुराव कोहळीकर सह मुख्याध्यापक गजानन रणखांब,मुख्याध्यापक. आर.एन. सागर, मुख्याध्यापक एस.डी. चव्हाण, मुख्याध्यापक वानखेडे, मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी, पर्यवेक्षक दिक्कतवार, प्रा.लक्ष्मण डाके, बी.आर.पवार,डी.एल.कोंडामंगल,शिक्षणाधिकारी शिवाचार्य, गटविकास अधिकारी मयुर आंदेलवाड, तहसिलदार डी. एन गायकवाड , धनसंपदा बँकेचे मॅनेजर गुरु हेंद्रे सह आई-वडिलांनी त्यांचे अभिनंदन केले आहे